Thursday, August 20, 2026
Homeसाताराअधिक मासामुळे सराफी बाजारपेठेला झळाळी | पुढारी

अधिक मासामुळे सराफी बाजारपेठेला झळाळी | पुढारी

अधिक मासामुळे सराफी बाजारपेठेला झळाळी | पुढारी

[ad_1]








सातारा; पुढारी वृत्तसेवा :  अधिक महिन्यात व्रत-वैकल्यांबरोबरच धोंडा साजरा करण्यात येत आहे. अधिक मासात जावई व लेकीसाठी नवीन कपडे, चांदीचे निरंजन व जोडवी, पैंजणाची खरेदी जोमात होत आहे. दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याने सराफी बाजारपेठेला झळाळी आली आहे.

अधिक महिन्यात धार्मिक कार्यक्रमांबरोबरच व्रतवैकल्यांची रेलचेल वाढली आहे. नवविवाहितांसाठी अधिक महिन्याचे विशेष महत्व आहे. अधिक महिन्यात मुलगी व जावई यांना बोलावून पाहुणचार करण्याची परंपरा कायम आहे. यावेळी गोडाधोडाच्या जेवणाबरोबरच नवीन कपडे व भेटवस्तू दिल्या जातात. जावयाला चांदीचे पूजा ताट, निरंजन तर मुलीला चांदीची जोडवी, पैंजण तसेच सोन्याचे दागिने दिले जातात. त्यामुळे सध्या जावई मंडळींची चंगळ सुरु आहे. अधिक मास अंतिम टप्प्यात आल्याने घरोघरी लेक जावयाचे कौतुक सोहळे सुरु आहेत. त्यासाठी जोमात खरेदी केली जात आहे. कापड बाजारपेठेसह सराफी पेढ्यांवर गर्दी होत आहे. पै-पाहुण्यांनाही अधिक मासासाठी बोलवण्यात येत आहे. या महिन्यात मिठाईलाही मागणी वाढली आहे. अधिक मासामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढली आहे. बाजारपेठेत अर्थकारणाला चालना मिळाली आहे.

सुवर्णपेढ्यांवर अधिक मनुष्यबळाची कुमक

  • अधिक मासामुळे जोडवी व पैंजणाला मागणी वाढल्याने हे दागिने तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये जादा कामगारांची गरज भासत आहे. जोडवी तयार केल्यानंतर त्यावर कलाकुसर करणे, जोड्या बांधणे, वजन करुन पॅकिंग करणे यासाठी जादा मनुष्यबळाची गरज पडत आहे.
  • सराफी दुकानांमध्येही वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी अधिकचे मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments