
[ad_1]
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी दादा कोंडके यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तब्बल ३१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले. तर, दादा कोंडके यांच्यासोबत मिळून त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची बाजू देखील संभाळली. उषा चव्हाण यांनी दादा कोंडके यांच्यासोबत १३ चित्रपटांसाठी सहनिर्माती म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे या चित्रपटांचा मालकी हक्क आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर, यातील काही चित्रपट टीव्हीवर दाखवले जाणार असल्याने, आता त्यांनी मालकी हक्काचा दावा करत कायदेशीर नोटिस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
[ad_2]
Source link
