Wednesday, October 7, 2026
Homeसाताराअपघातातील दुचाकीस्वाराकडे आढळला गावठी कट्टा, काडतुसे | पुढारी

अपघातातील दुचाकीस्वाराकडे आढळला गावठी कट्टा, काडतुसे | पुढारी

[ad_1]








खंडाळा, पुढारी वृत्तसेवा : खंडाळा गावाच्या हद्दीत शुक्रवारी रात्री कृष्णा गॅरेजजवळ एका दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. परंतु, या दुचाकी चालकाकडे गावठी कट्टा आढळून आल्यामुळे खंडाळ्यात खळबळ उडाली आहे. अजित बापुराव पवार (रा. शेडगेवाडी, ता. खंडाळा) असे या दुचाकीस्वाराचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः संशयित अजित पवार हा दुचाकीवरून जात असताना गॅरेजजवळ आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात तो किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

यावेळी घटनास्थळी नागरिकांना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयिताकडील गावठी कट्टा, काडतुसे, दोन मोबाईल आणि दुचाकी असा 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यगरग अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संशयिताकडे हा गावठी कट्टा कुठून व कसा आला? याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments