
साराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच तिचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात सारासोबतच विकी कौशल, राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. याआधी साराचे अतरंगी रे, केदारनाथ, लव्ह आज कल, कुली नंबर 1, गॅसलाइट हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.






