
आमदार सुनिल शेळके यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भाजप सोबत सत्तेत जाण्याअगोदर राष्ट्रवादीची एक बैठक झाली. या बैठकीतच भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं, या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यामुळे आम्हाला खासदार शरद पवार यांना सत्तेत जाण्यासंदर्भात विचारावं असं वाटलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट आमदार शेळके यांनी केला आहे.






