
सागर जनार्दन राऊत (वय, २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आजीला बोलवण्यासाठी गेली असता आरोपीने वाटेतच तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पीडिताने कशीतरी आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली. यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.







