Thursday, August 13, 2026
Homeसातारामुख्यमंत्री शिंदेंसह सहकारी भाजपचे भाडोत्री सैन्य : संजय राऊत | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंसह सहकारी भाजपचे भाडोत्री सैन्य : संजय राऊत | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंसह सहकारी भाजपचे भाडोत्री सैन्य : संजय राऊत | पुढारी

[ad_1]








कराड; पुढारी वृत्तसेवा :  रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांचे भाडोत्री वॅगनर सैन्य उलटले आहे. त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सहकारी म्हणजे भाजपचे भाडोत्री सैन्य आहे. भाडोत्री सैन्य कोणाचेच नसते. त्यामुळे हे भाडोत्री सैन्य भाजपवरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत आणि त्यानंतर गुढे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.

आमचे शिवसैनिक बालकमंत्री म्हणून हिणवत असलेले सातार्‍याचे पालकमंत्री मालकमंत्र्यांप्रमाणे वागत आहेत. मीच मालक, मी म्हणेल तसेच होईल, अशी हुकूमशाही दिल्लीत चालली नाही, त्याचप्रमाणे गल्लीतही चालणार नाही, असे राऊत म्हणाले. शंभूराज देसाई हे आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे पराभूत होतील, असे भाकित त्यांनी केले.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. 40 गद्दार आमदारांपैकी एकही विधानसभा निवडणुकीत विजयी होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

जेसीबी देतो, औरंग्याची कबर उखडणार का?

हिंदुत्वाचे रखवालदार असणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यापूर्वी औरंग्याची कबर उखडून टाकतो असे म्हणाले होते. आता आम्ही जेसीबी देतो, औरंग्याची कबर उखडणार का? असा सवाल त्यांनी केला. औरंग्यासमोर कोणीही गुडघे टेकू नयेत, ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments