Friday, October 2, 2026
Homeसातारासातारा : डोंबाळवाडीतील बेपत्ता तरुणाचा खून, दोघांना अटक; विहिरीत सापडला मृतदेह |...

सातारा : डोंबाळवाडीतील बेपत्ता तरुणाचा खून, दोघांना अटक; विहिरीत सापडला मृतदेह | पुढारी

[ad_1]








लोणंद; पुढारी वृत्तसेवा : डोंबाळवाडी, ता. फलटण येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सचिन नागनाथ धायगुडे (वय 35) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी (दि. ३१) सचिनचा मृतदेह गावातील एका विहिरीत सापडला.

याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप दत्तात्रय टेंगले व राहुल नामदेव धायगुडे (रा. डोंबळे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, डोंबाळवाडीतून सचिन धायगुडे हा युवक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी दि. २३ रोजी बेपत्ता झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली होती. त्यामुळे सचिन सापडत नसल्याने त्याचे नातेवाईक व पोलीस त्याचा शोध घेत होते. यादरम्यान बुधवारी सकाळी सचिनचा मृतदेह कॅनॉलशेजारील जलशुध्दीकरण केंद्रालगतच्या एका विहिरीत आढळून आला. ही गावात वार्‍यासारखी पसरल्यानंतर बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अनेक दिवस मृतदेह पाण्यात असल्याने परिसरात दुर्गंधी झाली होती. त्यामुळे घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

बोरी नावाच्या शेतातील शिवारात सचिन यांचा संशयित प्रदीप व राहुल यांच्याशी सायपन पाईप वापरण्याच्या कारणावरून वाद झाला होता. यानंतर सचिन बेपत्ता झाले होते. याबाबत सचिनचा दोघांशी वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र, गेले काही दिवस सचिनचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचा शोधच सुरू होता. मात्र, बुधवारी सकाळी सचिनचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयितांकडे आपला मोर्चा वळवला. पोलिसांनी दोघांनाही पकडून ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सपोनि विशाल वायकर करत आहेत.









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments