
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. नुकताच अनुष्काने शूटसाठी वेळेवर पोहचता यावे म्हणून बाईकचा पर्याय निवडला. मात्र, यादरम्यान तिने अशी चूक केली की, ती टीकेची धनी ठरली. यावेळी अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डने बाईक चालवली, तर अभिनेत्री त्याच्या मागे बसली होती. पण, यावेळी दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. यानंतर ती सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाली. यानंतर अनेकांनी मुंबई पोलिसांना टॅग करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.








