
सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांची हवा पाहायला मिळत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक चेहरे बॉलिवूड चित्रपट गाजवताना दिसत आहेत. बॉलिवूडलाही आता मराठी कलाकारांची भुरळ पडू लागली आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले झळकणार आहे. गिरीजाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याची माहिती दिली आहे. ‘गेली दोन वर्ष गाळलेला घाम, अश्रू आणि रक्त… अखेर माझा चित्रपट, आपला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.







