
सध्या शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो मुंबईत साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग करताना दिसला. आता दीपिकासोबतचे त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ते दोघेही ‘जवान’च्या गाण्याचे शूटिंग करत असल्याचे बोलले जात आहे. या फोटोंमध्ये दोघे पांढरा शर्ट, काळी पँट आणि मॅचिंग ब्लॅक बूट अशा लूकमध्ये दिसले आहेत. तर, दीपिकाने हायपोनीटेलसह गळ्यात लाल रंगाचा स्कार्फ बांधला आहे.






