
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता या मालिकांमधील सर्वाधिक लोकप्रिय पात्र कोणते हे समोर आले आहे. ही यादी टीआरपीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. या यादीमध्ये ‘कुंडली भाग्य’मधील प्रीता, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अक्षरा, ‘गुम है किसी के प्यार में’मधील सई, ‘तारक मेहता का उल्टा’ मालिकेतील जेठालाल आणि ‘अनुपमा’ यांनी टॉप ५मध्ये स्थान पटकावले आहे.







