Sunday, November 29, 2026
Homeफलटणपवारवाडी येथील बुद्ध विहारात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

पवारवाडी येथील बुद्ध विहारात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

पवारवाडी येथील बुद्ध विहारात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

पवारवाडी : मौजे पवारवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आणि भारतीय बौद्ध महासभेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या वतीने बुद्ध विहारात संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, बौद्ध बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळासाहेब निकाळजे यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले योगदान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संविधान निर्मिती प्रक्रियेत योगदान देणाऱ्या संविधान सभेतील सर्व सदस्य आणि मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यानंतर सामूहिक वंदना व सूत्रपठण करण्यात आले. महामानवांच्या विचारांना अभिवादन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले.

या कार्यक्रमास माजी प्राचार्य हनुमंत भोसले, संजय निकाळजे, विठ्ठल पवार, रामदास पोळके, सागर निकाळजे, भागवत भोसले, ऋषिकेश मोरे, आकाश भोसले, विकास सावंत, असलम सय्यद, इंद्रजीत सवाने, दत्ता कांबळे, लखन पोळके, सत्यजित भोसले तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी संस्कार सचिव तथा बौद्धाचार्य अमोल भोसले उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments