दादासाहेब भोसले यांची समतानगर येथील पंचशील बुद्ध विहारास सदिच्छा भेट
विडणी : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने देशभरात ग्रामशाखेपासून केंद्रीय कार्यकारिणीपर्यंत राबविण्यात येत असलेल्या BSI मिशन – २५ अंतर्गत महाराष्ट्र राज्य संघटक, समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर तसेच सातारा व पुणे जिल्हा प्रभारी व निरीक्षक आयु. दादासाहेब भोसले यांनी मौजे समतानगर, विडणी येथील पंचशील बुद्ध विहारास सदिच्छा भेट दिली.
यावेळी न्यू पंचशील तरुण मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, माजी सरचिटणीस आयु. बाबासाहेब जगताप, माजी खजिनदार आयु. विठ्ठल निकाळजे, सल्लागार ॲड. चंद्रशेखर मोरे, बौद्धाचार्य आयु. संजय घोरपडे, आयु. पारिजातका जगताप तसेच BBM फॅमिलीच्या महिला सदस्या व बौद्ध उपासिका उपस्थित होत्या.
यावेळी आयु. दादासाहेब भोसले यांनी BSI मिशन – २५ अंतर्गत निर्धारित करण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लवकरात लवकर ग्रामशाखेची स्थापना करून संघटनात्मक कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या. तसेच महिलांसाठी उपासिका शिबिर आयोजित करणे आणि उपासक-उपासिकांसाठी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेऊन मिशनची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता बुद्ध वंदना सूत्रपठणाने करण्यात आले.
