Monday, November 23, 2026
Homeफलटणआगामी दुष्काळी पार्श्वभूमीवर तिरकवाडी गावातील बंद अवस्थेतील सार्वजनिक विहीर व आड दुरुस्त...

आगामी दुष्काळी पार्श्वभूमीवर तिरकवाडी गावातील बंद अवस्थेतील सार्वजनिक विहीर व आड दुरुस्त करावा- जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली कांबळे यांचे निवेदन

आगामी दुष्काळी पार्श्वभूमीवर तिरकवाडी गावातील बंद अवस्थेतील सार्वजनिक विहीर व आड दुरुस्त करावा- जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली कांबळे यांचे निवेदन

फलटण : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मौजे तिरकवाडी ता.फलटण येथील ओढ्याच्यालगत असणाऱ्या सार्वजनिक विहीर व अडाची स्वच्छता करुन देणेबाबतचे
निवेदन बरड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.वैशाली संदीप कांबळे यांनी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. अक्षय घावटे यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,उपरोक्त विषयांस अनुसरून आपणांस कळविण्यात येते की, सध्या तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून पाणी टंचाईचे गंभीर संकट निर्माण होऊ लागले आहे. मौजे तिरकवाडी येथील नागरिकांना व पशुधनाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. गावातील ओढ्यालगत असणारी सार्वजनिक विहीर व आड हे ग्रामस्थांच्या पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत.मात्र या विहीर व आडामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झुडपे साचली असल्याने त्यातील पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. आगामी काळात पाणी टंचाईची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेता, या जलस्त्रोताचे पुनरुज्जीवन करणे अत्यंत गरजेचे आहे.

तरी मौजे तिरकवाडी येथील नागरिकांची पाण्याची गरज व टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन ओढ्यालगत असणाऱ्या सदर विहीर व आडातील गाळ काढून त्यांची तातडीने स्वच्छता व दुरुस्ती करून देण्याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत.
अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना यावेळी सौ.वैशाली संदीप कांबळे जिल्हा परिषद सदस्य बरड गट व सदस्य जिल्हा समाज कल्याण समिती सातारा, श्री.अक्षय सोनवलकर सामाजिक कार्यकर्ते ,निरंजन पिसाळ, तुकाराम यादव, प्रकाश सूर्यवंशी, राहुल यादव, पांडुरंग यादव, विकास यादव, सतीश मदने, आकाश यादव, अर्जुन यादव , राजेंद्र मदने, गणेश यादव ,रामभाऊ यादव इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments