पुणे येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्राचा 88 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण भवन सहकारनगर पुणे येथे आज दिनांक 22 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10.30 वा. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,कामगार कल्याण केंद्राचा 88 वा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा.श्री.राकेश माने साहेब ,आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका पुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.गायत्री शेट्टी आरोग्य सेविका भारती हॉस्पिटल पुणे ,प्रमुख उपस्थिती उमेश बरदे साहेब सामाजिक कार्यकर्ते, श्री आतिश भोसले सामाजिक कार्यकर्ते, श्री गणेश भोसले सामाजिक कार्यकर्ते, अमोल भोसले सामाजिक कार्यकर्ते तसेच मंडळामधील कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ गायत्री शेट्टी मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या योजना,उपक्रम कार्यक्रम याचा लाभ तळागाळातील कामगार वर्ग यांनी घेण्यात यावा.अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व कामगार कल्याण केंद्र कार्याच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ केंद्राचे कार्य तळागाळापर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री संदीप कांबळे केंद्रप्रमुख यांनी केले.त्यांनी मंडळाच्या योजना,उपक्रम, कार्यक्रम याविषयी माहिती दिली व या आर्थिक वर्षांमध्ये जास्तीत जास्त कामगार, कामगार कुटुंबीयांनी पुणे विभागातील कामगार वर्गाने लाभ घ्यावा अशी विनंती केली.
कार्यक्रमाचे आभार श्रीमती प्रतिभा एरब मॅडम यांनी मांडले कार्यक्रमास कर्मचारी वृंद श्री.विकास पवार व श्रीमती रंजना भाटे उपस्थित होते. तसेच कामगार भवन सहकार नगर येथील लाभार्थी कामगार व कामगार कुटुंबीय उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
