Saturday, October 17, 2026
Homeफलटणनिंबळकच्या श्री निमजाई देवीच्या चरणी वैशाली कांबळे कुटुंबीयांसह नतमस्तक!

निंबळकच्या श्री निमजाई देवीच्या चरणी वैशाली कांबळे कुटुंबीयांसह नतमस्तक!

जिल्हा परिषद सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे आणि संदीप कांबळे यांनी घेतले ग्रामदैवताचे दर्शन; कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी प्रार्थना

निंबळक | प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील निंबळक गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री निमजाई देवीचे सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे आणि कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी संदीप कांबळे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

निंबळक येथील श्री निमजाई देवीचे मंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे भक्तिमय वातावरण निर्माण होते. देवीच्या दर्शनासाठी निंबळकसह परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. विशेषतः सायंकाळच्या आरतीच्या वेळी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. यामध्ये महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय असते.

निंबळकच्या सूनबाई सौ. वैशाली संदीप कांबळे यांची काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह ग्रामदैवत श्री निमजाई देवीचे दर्शन घेऊन देवीचा आशीर्वाद घेतला. देवीची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर कायम राहावी, तसेच जनसेवेचे कार्य करताना सदैव बळ व मार्गदर्शन मिळावे, अशी मनोभावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ग्रामदैवतावरील श्रद्धा आणि परंपरेशी असलेले नाते जपत कांबळे कुटुंबीयांनी घेतलेल्या या दर्शनामुळे परिसरातील धार्मिक वातावरणात भक्तिभावाचे दर्शन घडले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments