आढाववस्ती येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर; सैनिक नोंदणीसाठी आवाहन
फलटण : भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा सातारा (पूर्व) यांच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ग्रामशाखा आढाववस्ती (गुणवरे), ता. फलटण, जि. सातारा (पूर्व) येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच नव्या सैनिकांची नोंदणी करून संघटनात्मक बळ वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक, केंद्रीय शिक्षक, सातारा व पुणे जिल्ह्याचे प्रभारी तथा समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. केंद्रीय शिक्षक आयु. संपत भोसले (मेजर, SSD) आणि आयुनि. अर्चना चव्हाण (कंपनी कमांडर, समता फोर्स, SSD) हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
BSI मिशन २५ अंतर्गत समता सैनिक दलाच्या विस्ताराचे उद्दिष्ट
BSI मिशन २५ अंतर्गत समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्ष २०२७ पर्यंत प्रत्येक तालुका व शहर शाखेत २,००० सैनिक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी किमान ५६ ठिकाणी ५६ सैनिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन आहे. तसेच प्रत्येक रविवारी संबंधित शाखेच्या कार्यक्षेत्रातील मैदानावर किंवा बुद्धविहारासमोर सैनिकांची साप्ताहिक परेड आयोजित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी समता सैनिक दलाचे प्रमुख तथा भारतीय बौद्ध महासभा आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, तसेच ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राज्यांमध्ये समता सैनिक दलाची प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत.
समता, बंधुता, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकजूट या मूल्यांची जोपासना करणे, कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी प्रशिक्षित सैनिकांची फळी उभी करणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा हेतू आहे.
प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनी संपर्क साधावा
समता सैनिक दलामध्ये सहभागी होऊन प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवकांनी, कार्यकर्त्यांनी तसेच धम्म चळवळीतील इच्छुक अनुयायांनी पुढील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयु. नानासो मोहिते सर अध्यक्ष, जिल्हा शाखा सातारा (पूर्व)- 96044 89058, आयु. सुनील कदम सर – सरचिटणीस: 86050 44929 – आयु. नंदकुमार शिंदे सर कोषाध्यक्ष – 9850597154, आयु. संपत भोसले सर – संरक्षण उपाध्यक्ष – 7030177100, आयुनि. अर्चना चव्हाण – कंपनी कमांडर, समता फोर्स – 94223 65491, आयु. अविनाश बारसिंग सर – संस्कार उपाध्यक्ष – 82750 48522, आयु. बाळासाहेब जाधव सर – हिशोब तपासणी – 7448224181
या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वितेसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखा सातारा (पूर्व), फलटण तालुका शाखा, शहर शाखा, ग्रामशाखा व वॉर्ड शाखा प्रयत्नशील आहेत. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी, प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवकांनी आणि धम्म चळवळीतील अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
“जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है!”
