Thursday, October 8, 2026
Homeफलटणकांशीरामजींच्या स्मृतीदिनानिमित्त तिरकवाडीत वृक्षलागवड व संविधान जागृती उपक्रम

कांशीरामजींच्या स्मृतीदिनानिमित्त तिरकवाडीत वृक्षलागवड व संविधान जागृती उपक्रम

वटवृक्ष, बोधिवृक्ष लागवडीसह विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेचे वाटप; साहित्यिक तानाजी जगताप यांचे मार्गदर्शन

फलटण : बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथे सामाजिक, पर्यावरणीय आणि संविधानिक जागृतीचा संदेश देणारा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता जि.प. शाळा तिरकवाडी व जय भवानी हायस्कूल येथे हा उपक्रम होणार आहे.

कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतींना अभिवादन करताना वटवृक्ष व बोधिवृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास बहुजन समाज पार्टीचे प्रमुख प्रवक्ते व साहित्यिक तानाजी जगताप प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

या उपक्रमाचे आयोजन बहुजन समाज पार्टी – फलटण विधानसभा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. अध्यक्ष प्रदिप उर्फ प्रेम जयश्री सुरेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष दिनेश कांबळे, कोषाध्यक्ष सुहास काकडे, महासचिव महेश इठापे, मनोज सावंत, अमोल भालेराव, राजकुमार घोरपडे, बीव्हीएफचे संदिप सोणवणे, बीव्हीएफ संयोजक सर्वेश मोरे, नेते मंगेशभाऊ मोरे आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

तसेच फलटण विधानसभा प्रभारी प्रविण विटकर, जिल्हा प्रभारी सुरेश झेंडे, जिल्हा सचिव उदय काकडे आणि जिल्हा अध्यक्ष आनंद थोरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषदचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास भीम अनुयायी, बसपा हितचिंतक, बामसेफ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

स्थळ : जि.प. शाळा तिरकवाडी व जय भवानी हायस्कूल
दिनांक : ९ ऑक्टोबर २०२६, शुक्रवार
वेळ : सकाळी ९.०० वाजता

जय भीम | जय भारत | जय संविधान | जय बसपा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments