सांचीपासून तेलंगणा, तेर आणि श्रीलंकेपर्यंत विविध ऐतिहासिक व बौद्ध स्थळांचा अभ्यास करण्याची संधी
साहस Times : इतिहास, संस्कृती, बौद्ध वारसा आणि प्राचीन वास्तूंचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी देण्यासाठी पांथस्थच्या माध्यमातून विविध अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यास दौऱ्यांच्या माध्यमातून विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देत त्या ठिकाणचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक महत्त्व समजून घेण्याची संधी सहभागी नागरिकांना मिळणार आहे.
या अभ्यास दौऱ्यांमध्ये सांची महोत्सव, तेलंगणातील बुद्धवनम, तेर (धाराशिव) तसेच श्रीलंका आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा यांचा समावेश आहे.
अभ्यास दौऱ्यांचे नियोजन
१) सांची महोत्सव
सांची महोत्सवासाठीच्या जागा पूर्ण झाल्या असून आता नोंदणी बंद करण्यात आली आहे.
२) तेलंगणा – बुद्धवनम अभ्यास दौरा
📅 १७ ते २० डिसेंबर २०२६
या दौऱ्यासाठी नाव नोंदविण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२६ आहे. तेलंगणातील बुद्धवनम परिसराचा ऐतिहासिक व बौद्ध वारसा अभ्यासण्याची संधी या दौऱ्यात मिळणार आहे.
३) तेर (धाराशिव) अभ्यास दौरा
📅 २५ डिसेंबर २०२६
या अभ्यास दौऱ्यासाठी मोजक्याच जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
४) श्रीलंका आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा
📅 मे २०२७
बुद्ध पौर्णिमा / वैशाख पौर्णिमा निमित्ताने श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीलंकेतील बौद्ध वारसा, ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करण्याची संधी या दौऱ्याच्या माध्यमातून मिळणार आहे.
लवकर नाव नोंदणी करण्याचे आवाहन
पांथस्थच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या अभ्यास दौऱ्यांसाठी नियोजित तारखेच्या सुमारे ६० दिवस आधी प्रवासाचे तिकीट काढणे आवश्यक असल्याने इच्छुकांनी शक्य तितक्या लवकर आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित अभ्यास दौऱ्यांच्या समूहात सहभागी होऊन नोंदणी करता येणार आहे.
तेलंगणा – बुद्धवनम अभ्यास दौरा:
https://chat.whatsapp.com/BTb2ZLNE32G3xOIRyHp5OO
तेर (धाराशिव) अभ्यास दौरा:
https://chat.whatsapp.com/Jk26WiGq4go3OeQqND7nnc
श्रीलंका आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा:
https://chat.whatsapp.com/JABXfFQkaszIiJodItlfT0
सूरज रतन जगताप ( लेणी अभ्यासक )
