फलटण व पंचक्रोशीतील ग्राहकांच्या विश्वासाला प्रतिसाद; डेक्कन चौकातील भोईटे हाईट्स येथे नवीन कार्यालय
फलटण : फलटण व पंचक्रोशीतील असंख्य ग्राहकांनी दिलेल्या विश्वासामुळे आणि मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मॅग मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटण आता अधिक प्रशस्त व नवीन जागेत स्थलांतरित होत आहे. या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
मॅग मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. (रजि. नं. एम.एस.सी.एस./सी.आर./७२४/२०१३) ही संस्था फलटण व परिसरातील ग्राहकांना आर्थिक सेवा देत असून ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे. ग्राहकांना अधिक चांगल्या, सुलभ आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेने प्रशस्त व आधुनिक नवीन कार्यालयात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा भोईटे हाईट्स, डेक्कन चौक, एसबीआय बँकेसमोर, फलटण येथे संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास ग्राहक, हितचिंतक, सभासद आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संस्थेच्या मार्गदर्शनासाठी श्री. अनिल मोहोटकर यांचे मार्गदर्शन लाभत असून संस्थेचे अमेय मोहोटकर (चेअरमन), शलाका मोहोटकर (CEO), श्री. विराज पवार (DGM) आणि श्री. सचिन अहिवळे (BM) हे संस्थेच्या कार्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.
तसेच संचालक मंडळामध्ये सौ. विद्या बेंद्रे, श्री. दत्तात्रय भांबुरे, श्री. शिवाजी रणवरे, श्री. मुरलीधर देंगवणी, श्री. सचिन डोईफोडे आणि सौ. दिपाली अहिवळे यांचा समावेश आहे.
ग्राहकांचा विश्वास आणि संस्थेला मिळणारा सातत्यपूर्ण प्रतिसाद यामुळे मॅग मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या प्रगतीला नवी दिशा मिळत असून नवीन प्रशस्त कार्यालयातून ग्राहकांना अधिक प्रभावी व सुविधाजनक सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नवीन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन मॅग मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
