आराधना हा शब्दच मुळात अत्यंत परम, पवित्र, पावन, निर्मळ आणि सात्विक असा प्रतिष्ठित आहे. आराधना म्हणजेच आपण ज्या देवतेला,दैवताला परम श्रेष्ठ स्थानी मानतो त्यांची उपासना, भक्ती, पूजा, मनोभावे स्तुती करणे. आराधना हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ विनम्रतापूर्वक केलेली प्रार्थना, देवतेला प्रसन्न करण्यासाठी भक्तीचे पावन अधिष्ठान असलेला सोहळा असा होतो. आराधना : परमइष्ट आराध्य देवतेची पूजा स्तुती, वंदना, तसेच तनमनाने विनम्र होऊन एकत्व भावनेने केलेली आळवणी म्हणजे प्रार्थना. आणि याच प्रार्थनेचा परमउच्च उत्कृष्ट सोहळा म्हणजेच आराधना. आराध्य, आराधना व आराधक : आपण ज्यांना आपल्या जीवनात आयुष्यात सर्वश्रेष्ठ स्थानी मानून त्यांची उपासना, भक्ती करत असतो, त्यांच्या मंगलमय आशीर्वादयुक्त प्रसादाची पवित्र पावन अशी अपेक्षा करत असतो त्याला आराध्य असे म्हणतात. या मंगलमय आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी केलेली प्रक्रिया म्हणजेच आराधना. आणि मनोभावे शुद्ध अंतःकरणाने ही प्रक्रिया जो करतो तो आराधक. साध्य, साधन, साधक: आराध्याच्या प्राप्तीसाठी आराधक जी साधक जी आराधना करतो त्यासाठी मात्र काही अनिवार्यता, आवश्यकता असतात. त्यात महत्त्वाचे म्हणजे १: साध्य ( आराध्य प्राप्ती आणि एकरुपता ), २: साधन ( आराधना किंवा भक्तीची प्रक्रिया ), ३: साधक ( शुद्ध सात्विक स्वरूपात असलेला आराधक ) साध्याच्या प्राप्तीसाठी आयुष्यभर प्रत्येक श्वासागणिक केलेली परिश्रमापूर्वक साधना ही प्रमाणे उत्कृष्ट होण्यासाठी साधनाशुद्धी ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते. साध्याच्या शुद्ध स्वरूपात प्राप्तीसाठी साधना शुद्ध असणे आवश्यक असते. साधन शुद्ध नसेल, नसतील तर मात्र स्वाध्यायही शुद्ध किंवा संपूर्ण स्वरूपात प्राप्त होत नसते. म्हणून साधनशुद्धीला अत्यंत महत्त्व आहे. यामध्येच साधकाची साधनेशी असलेली निष्ठा प्रामाणिकता पवित्रता अंतरीक व बाह्य शुद्धी, मन वचन भाव आणि शरीराची पवित्रता याला फार मोठे महत्त्व आहे. आपल्याला जेथे पोहोचायचे त्यासाठी आपण ज्या साधनाने जातो ते साधनच व्यवस्थित उत्कृष्ट उत्तम नसेल तर ते पोहोचणे कष्ट पूर्ण होऊन त्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. हीच साधनशुद्धी. या प्रकारे आराधना करायची असते. अनेक विचारवंतांनी, समाज सुधारकांनी, साधुसंतांनी साध्य साधन विवेक यावर अनेक ठिकाणी महत्त्वपूर्ण असे भाष्य करून त्यास मोठे महत्त्व दिलेले आहे. आराधना आणि असफलता अनेक वेळा,अनेक ठिकाणी आपण असे पाहतो किंवा आपल्या अनुभवास येते की अनेक लोक कित्येक वर्षापासून पूजा आजच्या आराधना करताना दिसतात परंतु त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये फारसा फरक आणि शुद्धता निर्मळता सात्विकता दिसत नाही. या उलट त्यांच्यामध्ये क्रोध,मान माया,लोभ,राग,द्वेष,मद मोह, मत्सर, निर्दयता, परोपकार भावनेचा अभाव, वाचिक अशुद्धता दिसून येते. याचाच अर्थ असा की परम ईस्ट आशा सध्याच्या प्राप्तीसाठी त्यांनी केलेली साधना आराधना यामध्ये प्रामाणिकता, शुद्धता विवेकनिष्ठता, आंतरबाह्य शुद्धी व एकाग्रतेचा प्रामुख्याने अभाव असल्याने त्यांच्या साधनेचे आराधनेचे फलित पूर्णत्वास नस गेलेले व तशा सात्विक अनुभूती त्यांच्या वर्तनात दिसून येत नाहीत तर अप्रसन्नता आणि राग द्वेष अत्याधिक मोह, दुर्भावना दिसून येतात. महत्त्वाचे
म्हणूनच आराधना उत्कृष्ट होण्यासाठी साध्य साधन विवेकाची अत्यंत प्रामुख्याने अनिवार्यता आहे. आराध्याच्या उत्कृष्ट प्रसादाची, परम पावन शुद्ध स्वरूपात प्राप्ती होण्यासाठी आराधक किंवा साधक स्वतः मध्ये किती अंतरिक शुद्ध आणि साधना आराधण्याची प्रामाणिक एकाग्र एकनिष्ठ असावा हेही अत्यंत महत्त्वाचे. (संपर्क- 9420015108)
Source link








