Monday, August 17, 2026
Homeफलटण१० हजारांहून अधिक गाणी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी विचारांचा बुलंद...

१० हजारांहून अधिक गाणी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डक : आंबेडकरी विचारांचा बुलंद आवाज

फलटण : महामानव यांच्या विचारांना महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचविणारे ज्येष्ठ लोककवी, शाहिर आणि प्रबोधनकार यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी नाशिक जिल्ह्यातील येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या वामनदादांनी आपल्या लेखणीच्या बळावर समाजप्रबोधनाचे महान कार्य उभे केले.
वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची १८ एकर शेती असूनही आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. आई सईबाई मोलमजुरी करून संसार चालवत होत्या. लहानपणी वामनदादांनी गाई-म्हशी चारण्याचे काम केले. पुढे मोठ्या भावाला रेल्वेत नोकरी मिळाल्यानंतर कुटुंब मुंबईत आले. शिवडी येथील बीडीडी चाळीत राहात असताना त्यांनी बाराखडी शिकली आणि स्वतःच्या जिद्दीने वाचनातून ज्ञान मिळवले.
रेल्वे, हिंदुस्थान लिव्हर, नोट प्रेस अशा ठिकाणी नोकऱ्या केल्या; मात्र त्यात मन रमले नाही. कधी गिरणीत काम, कधी आईस्क्रीम विक्री तर कधी कोळसा विकून त्यांनी उदरनिर्वाह केला. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी मिनर्व्हा, करदार आणि रणजित फिल्म स्टुडिओमध्येही काम केले. याच काळात त्यांनी प्रसिद्ध गीतकार प्रदीप यांच्या देशभक्तीपर गाण्याचे विडंबन करून आंबेडकरी चळवळीचा आवाज बुलंद केला. बीडीडी चाळीत त्यांच्या या गीताला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि इथूनच एका महान कवीचा जन्म झाला.
वामनदादांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. ‘सांगते ऐका’सारख्या गाजलेल्या चित्रपटाची गाणीही त्यांनी रचली. मात्र १९४३ मध्ये नायगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवली आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःला वाहून घेतले.
दादासाहेब गायकवाड यांच्या सहवासात आल्यावर त्यांनी गावोगावी फिरून गीतांच्या माध्यमातून आंबेडकरी विचार जनतेपर्यंत पोहोचवले. तबला, पेटी आणि सहकाऱ्यांसह ते कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रबोधनाचे कार्य करत राहिले. त्यांनी केवळ आंबेडकरीच नव्हे तर देशभक्तीपर गीतांनाही मोठे योगदान दिले. त्यांच्या ४०० देशभक्तीपर गीतांचा स्वतंत्र खंड प्रकाशित झाला आहे. मराठीसोबत हिंदी गीतलेखनातही त्यांनी ठसा उमटवला.
वामनदादांनी आयुष्यात तब्बल १० हजारांहून अधिक मराठी आणि हिंदी गीते लिहिली. प्रा. सागर जाधव यांनी त्यांच्या गीतांचे १६ खंड प्रकाशित करण्याचा संकल्प केला असून त्यापैकी अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. माधवराव गायकवाड आणि सुमित्रा गायकवाड यांनी त्यांच्या सुमारे २२०० गीतांचे संकलन केले आहे.
अत्यंत मोठे साहित्यिक योगदान असूनही वामनदादांचे अखेरचे दिवस मात्र कठीण परिस्थितीत गेले. गंगाखेड येथे विलास जंगले यांच्या घरी त्यांनी आयुष्याचा शेवटचा काळ व्यतीत केला. निधनाच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी लिहिलेले गीत आजही असंख्यांच्या डोळ्यांत अश्रू आणते—
“राहील विश्व मागे, जाईल मी उद्याला
निर्वाण गौतमाचे, पाहिल मी उद्याला…”
१५ मे २००४ रोजी या महान शाहिराने अखेरचा श्वास घेतला. गंगाखेड येथे त्यांच्या समाधीस्थळी त्यांच्या अमर ओळी कोरलेल्या आहेत—
“माणसा इथे मी तुझे गीत गावे,
असे गीत गावे तुझे हित व्हावे…”
आज त्यांच्या स्मृतिदिनी महाकवी वामनदादा कर्डक यांना विनम्र अभिवादन.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments