राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबईत आज हलक्या सरी, पुणे, सातारा, नाशिकमध्ये ग

0
1


Unseasonal Rain In Maharashtra: राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Unseasonal Rain In Maharashtra) देण्यात आला आहे. मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Unseasonal Rain In Maharashtra)

विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. अमरावती, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये गारपिटीची शक्यता आहे. मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. संध्याकाळ दरम्यान 40 ते 50 किमी प्रति ताशी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता- (Rain In Mumbai)

मध्य महाराष्ट्रात देखील सर्वत्र वादळी वाऱ्यांसह पाऊस, काही ठिकाणी 50 ते 60 किमी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात देखील काही जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

धुळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान- (Rain In Dhule)

धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तब्बल 8 हजार 145 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये धुळे आणि साक्री  तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान साक्री  तालुक्यात झाले असून तेथील 9 हजाराहून अधिक शेतकरी बाधित झाले आहे तर धुळे तालुक्यातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जिरायत क्षेत्रात मका आणि उन्हाळी बाजरीचे नुकसान झाले आहे. बागायती क्षेत्रात सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला असून भाजीपाल्याचे देखील 321 हेक्टरवर नुकसान झाले आहे फळपिकांमध्ये पपई डाळिंब आणि आंब्याच्या मोहर गळून पडल्याने बागायतदार हवालदील झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा व लवकरात लवकर मदत मिळण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्येही अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा तडाखा- (Rain In Gondiya)

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात काल सायंकाळी आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाचे वतीने गोंदिया जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता काल सायंकाळी अचानक मोरगाव तालुक्यात काही भागात वादळी वारा व अवकाळी पाऊस आला. वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिका जमीनदोस्त झाला आहे. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

राज्यात पुन्हा अवकाळीचा दणका! फळबागांसह कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत, खासदार ज्योती वाघमारे बांधावर

आणखी वाचा



Source link