सातारा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्याने शिक्षक अडचणीत आले आहेत. शिक्षकांची C-TET ही परीक्षा देशभरात 7 आणि 8 तारखेला होणार आहे. निवडणुकीमुळं परीक्षा आणि निवडणूक ड्युटी एकाच वेळी आल्याने शिक्षक संभ्रमात पडले आहेत. परिक्षा द्यायची की निवडणूक ड्युटी करायची असा संभ्रम शिक्षकांमध्ये आहे.
7 आणि 8 तारखेला C-TET परीक्षा
केंद्रीय स्तरावरील ही परीक्षा असल्याने या 12 जिल्हा परिषद गटातील बहुतांशी शिक्षक या परीक्षेला बसलेले आहेत. दुसरीकडे एक प्रशिक्षण निवडणुकीचे झाल्याने आता या शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द होणार का? की कारवाईला सामोरे जावे लागणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. 3 तारखेला केंद्रप्रमुख परिक्षा आहे. 7 आणि 8 तारखेला C-TET परीक्षा आहे. दोन्ही परिक्षांची केंद्र जिल्ह्याबाहेर आहेत. सात आणि आठ तारखेला या परीक्षा सकाळी आठ वाजता सुरु होणार आहेत.
निवडणुक आयोगाच्या एका निर्णयामुळे शिक्षक अडचणीत
नगरपालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने इलेक्शन ड्युटी करीत दमछाक झालेले शिक्षक आता निवडणुक आयोगाच्या एका निर्णयामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवस दुखवटा पाळण्यात येत आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. अजितदादा यांच्या निधन दुखवट्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा बदलल्याने शिक्षकांची मोठी कोंडी झाली आहे. त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा अन् जिल्हा परिषद पंचायत समितीचे कर्तव्य एकाच वेळी आल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही कर्तव्य अत्यावश्यक सेवेत येत असल्याने नेमके प्राधान्य कशाला द्यावे, या विचारात शिक्षक अडकले आहेत. कामाचा ताण वाढल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य हरवू लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.
महत्वाच्या बातम्या:
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
आणखी वाचा








