Friday, August 21, 2026
Homeसातारापत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, टेम्पो-दुचाकीच्या धडकेत जवानाचा दुर्दैवी अंत; नवजात बालिक

पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, टेम्पो-दुचाकीच्या धडकेत जवानाचा दुर्दैवी अंत; नवजात बालिक

पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला, टेम्पो-दुचाकीच्या धडकेत जवानाचा दुर्दैवी अंत; नवजात बालिक

[ad_1]

Satara Accident: भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेला जवान (Soldier) पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असताना त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यात (Satara News) घडली. सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात (Satara Accident) जागीच मृत्यू झाला. या घटनेने दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली आहे.

प्रमोद जाधव यांना आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. दरम्यान, काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच कुटुंबीयांसह गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. आज सकाळी वीर जवान प्रमोद जाधव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. पित्याच्या मृत्यूची बातमी आणि घरात आलेला नव्या जीवाचा आनंद, या दोन्ही भावनांनी कुटुंबीय हादरून गेले.

Satara Accident: काही तासापूर्वीच जन्मलेल्या बालिकेने घेतले अंत्यदर्शन

अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले. शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना

Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर

आणखी वाचा

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments