घणसोलीचे भूमीपुत्र धनंजय गणेश जगताप यांना शिट्टी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन

0
46
घणसोलीचे भूमीपुत्र धनंजय गणेश जगताप यांना शिट्टी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन


साहस Times :- घणसोली परिसरात येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार धनंजय गणेश जगताप यांना नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. “घणसोलीचे भूमीपुत्र” म्हणून ओळख असलेले धनंजय जगताप हे समाजसेवेचा समृद्ध वारसा लाभलेले, सुसंस्कृत आणि सुशिक्षित तरुण नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत.
स्थानिक प्रश्नांची सखोल जाण, सामान्य नागरिकांच्या अडचणींबाबत असलेली तळमळ आणि सातत्याने केलेले सामाजिक कार्य यामुळे ते घणसोलीतील जनतेच्या विश्वासाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच युवक व महिलांसाठी विकासाभिमुख उपक्रम राबवण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेशी निष्ठावान राहून त्यांनी नेहमीच वंचित, उपेक्षित आणि सामान्य घटकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आहे. राजकारणाला सेवाभावाची जोड देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचे स्वप्न ते घेऊन मैदानात उतरले आहेत.
घणसोलीच्या सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की, येत्या निवडणुकीत “शिट्टी” या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून आपले बहुमूल्य मत धनंजय गणेश जगताप यांच्या पारड्यात टाका आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. परिवर्तनासाठी, विकासासाठी आणि न्यायासाठी एकजुटीने मतदान करूया.