Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रमहापालिका निवडणूकसुशिक्षित आणि सर्वसामान्य चेहऱ्याला वाढती पसंती.चेतन बेंद्रे ठरू शकतात सत्तेच्या सारीपाटावरले नवे...

सुशिक्षित आणि सर्वसामान्य चेहऱ्याला वाढती पसंती.चेतन बेंद्रे ठरू शकतात सत्तेच्या सारीपाटावरले नवे वजीर.

पिंपरी चिंचवड : राजकारणात पक्षाची धुरा ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या पाठीवर उभी असते. आणि त्यातही जर कार्यकर्ता सुशिक्षित आणि संयमी असला तर सत्तेची गणिते पक्षाला मांडायला आणखी सोपी जातात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ ( ड ) मधून ही अश्याच एका सुशिक्षित चेहऱ्याची चर्चा सध्या जोरात आहे. ते नाव आहे, शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन गौतम बेंद्रे.

अनेक राजकीय घडामोडींनंतर चेतन बेंद्रे यांनी अखेर शिवसेना पक्षाची वाट धरली. आणि पक्षाने देखील तितकीच दखल घेत चेतन यांना प्रभाग क्रमांक १५ ( ड ) मधून अधिकृत उमेदवारी जाहीर केली.

कदाचित ही उमेदवारी जाहीर झाल्या नंतर लोकांमध्ये विविध चर्चा रंगतील असे काहीसे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. जनतेने पक्षा पेक्षाही जास्त चेतन बेंद्रे यांना अधिक प्राधान्य देत शिवसेना पक्षाच्या माध्यमातून चेतन बेंद्रे यांना जोरदार पाठिंबा दिलेला दिसत आहे.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये चेतन बेंद्रे यांनी आजपर्यंत केलेले दखलपात्र असे सामाजिक काम त्यांना या साऱ्या सत्ताकारणाच्या गणितात कायम उजवे ठेवत आहे.

आपल्यातून आपल्यासाठी उभा राहिलेला सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून चेतन बेंद्रे यांना वाढती पसंती मिळत आहे. आणि त्यातच त्यांच्याकडे असलेल्या सामाजिक कामाचा मोठा अनुभव त्यांना अजून फायद्याचा ठरत आहे.

चेतन बेंद्रे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १५ (ड ) ला एक सुशिक्षित नगरसेवक लाभणार या चर्चांनी जोर धरला आहे. पण शेवटी मतांची जुळवणी महत्वाची असते. ती मतांची जुळवणी चेतन बेंद्रे यांच्या पारड्यात किती आकड्यांच्या रुपात पडणार हे येत्या १६ जानेवारीला कळेलच.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments