
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ अ गटातील निवडणूक सध्या विशेष चर्चेत आहे. विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी या प्रभागात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार कैलास कुटे यांचे नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे.
प्रचाराच्या निमित्ताने नागरिकांशी थेट संवाद, बैठका आणि प्रचार फेऱ्यांमधून कैलास कुटे यांना मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, स्थानिक प्रश्नांची जाण आणि सातत्याने जनतेशी असलेला संपर्क यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या विषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभाग क्रमांक १४ मधील प्रचारादरम्यान कैलास कुटे यांच्या बाजूने झुकणारा जनमताचा कल जाणवतो आहे. नागरिकांशी झालेल्या संवादातून मूलभूत सुविधा, विकासकामे आणि प्रशासनातील पारदर्शकतेबाबत त्यांनी मांडलेली भूमिका मतदारांना भावताना दिसत आहे.
या प्रभागात लढत असली तरी प्रचारातील एकूण वातावरण पाहता कैलास कुटे यांना तुलनेने अनुकूल स्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र लोकशाही प्रक्रियेत अंतिम निर्णय हा मतदारांचाच असतो आणि तो १६ जानेवारीला मतपेटीत बंद होणार आहे.
प्रचाराच्या सध्याच्या चित्रावरून प्रभाग क्रमांक १४ मधील निवडणूक निकालाबाबत उत्सुकता वाढली असून, कैलास कुटे यांच्या बाजूने उमटणारा जनसमर्थनाचा कौल किती मताधिक्याने प्रत्यक्षात दिसून येतो, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.








