Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीच्या स्वयंवरात मोठा राडा होणार; अक्षरा भुवनेश्वरी समोर येणार?

0
22
Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीच्या स्वयंवरात मोठा राडा होणार; अक्षरा भुवनेश्वरी समोर येणार?


‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आहे, एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भश्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे. तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे. शिक्षण फक्त प्रगती करत नाही, तर चरित्र घडवतं. शिक्षण तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करते, असे तिचे म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्विकारलं. तर, मालिकेचा नायक अधिपतीने नववीनंतर शिक्षण सोडलं. कारण, त्याची आई भुवनेश्वरीचं म्हणणं आहे की, शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असतं, त्यामुळे त्यांना नोकरी लागते.



Source link