Sunday, September 20, 2026
Homeसातारापत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा

पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा


फलटण, दि. ४ : फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही माजी आमदार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसंदेशकार कै. कॉ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. ७ व ८ जानेवारी रोजी माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल (घडसोली मैदान), फलटण येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संघ सहभागी होणार आहेत. अत्यंत उत्साही, आनंदी आणि खेळकर वातावरणात या स्पर्धा नेहमीच यशस्वीपणे पार पडत असून, यंदाही तसाच उत्साह पाहायला मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार असून, त्यानंतर फलटण शहर व तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय नेते यांच्या संघांमध्ये प्रदर्शनीय सामना रंगणार आहे. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघांमध्ये नियमानुसार साखळी व अंतिम सामने खेळवले जाणार आहेत.
फलटण शहर व तालुक्यातील क्रिकेटप्रेमींनी दोन्ही दिवस या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments