
फलटण | नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 12 मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. दत्तनगर येथे झालेल्या बैठकांना प्रभागातील अनेक नागरिक, युवा कार्यकर्ते, महिला आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेना व राजे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, तसेच नगरसेवक विकास वसंतराव काकडे व स्मिता शहा यांना सक्रिय पाठिंबा दर्शवत आहेत. या बैठका श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होत आहेत.
प्रभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामांची गरज आणि शिवसेना–राजे गटाचा वाढता प्रभाव यामुळे हा पाठिंबा मिळत असलेचे उपस्थितांनी सांगितले. तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले—
“फलटण शहरातील सर्व प्रभागांत विकासाची दिशा तयार करण्यासाठी सक्षम नेतृत्व आणि जनतेचा विश्वास आवश्यक आहे. आज प्रभाग 12 मधील नागरिकांनी दाखवलेला विश्वास म्हणजे आगामी निवडणुकीतील मोठा संकेत आहे.”
या घडामोडींमुळे प्रभाग 12 मधील निवडणुकीचे चित्र बदलत असल्याचे आणि आगामी निवडणुकीत शिवसेना व राजेगटाला बळकटी मिळू शकते, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.








