Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण नगरपरिषद निवडणूक २० डिसेंबरला; प्रचारात नव्या जोमानं उतरले कार्यकर्ते

फलटण नगरपरिषद निवडणूक २० डिसेंबरला; प्रचारात नव्या जोमानं उतरले कार्यकर्ते

साहस टाईम्स फलटण :- :तांत्रिक कारणांमुळे फलटण नगरपरिषद निवडणूक २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबर २०२५ रोजी होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबरला होणार आहे. निवडणुकीची तारीख पुढे ढकलली असली तरीही, अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात कोणतीही खंड पडू न देता प्रचारकार्य नव्या जोमानं सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अनिकेतराजे नाईक-निंबाळकर तसेच प्रभाग क्रमांक १२ मधील अधिकृत उमेदवार विकास वसंतराव काकडे व स्मिता शहा यांच्या प्रचारात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन पुढील रणनीती निश्चित केली.

विकास वसंतराव काकडे यांना कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले की
“अडचणी जरी निर्माण झाल्या असल्या, तरी मिळालेल्या संधीचे सोनं करण्यासाठी आपण अधिक जोमानं कामाला लागणार आहोत. निवडणुकीची तारीख पुढे गेली असली तरी ही फक्त एक मध्यांतराची वेळ आहे. या मध्यांतराचा शेवट आपण २१ तारखेला भक्कम विजयाने करणार आहोत.”

प्रचाराचे काम अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेत कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद वाढवण्याचे, तसेच आपल्या उमेदवारांबद्दल जनतेत सकारात्मक लाट निर्माण करण्याचे ठरवले आहे.

निवडणूक पुढे ढकलल्यामुळे प्रचाराला अधिक वेळ मिळाल्याचे भांडवल न करता, संघटन अधिक मजबूत करण्यास आणि जनतेशी संपर्क वाढवण्यास हे काळ उपयुक्त ठरणार असल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments