
Anencephaly Baby : गर्भधारणा झाल्यानंतर बाळाच्या जन्मापर्यंत आईला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहार, नियमित तपासणी आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधं नियमित घ्यावी लागते. गर्भातील बाळाचा विकासासाठी आईसोबत कुटुंबातील इतर सदस्यांनी अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागतात. आई किंवा कुटुंबाच्या थोड्याही दुर्लक्षाने बाळाच्या जीवावर बेतू शकतं. अशी एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया गुप्ता यांनी सांगितलं आहे. कुटुंबाच्या एका चुकीमुळे विना डोक्याचं बाळ जन्माला आलं आहे. नेमकं काय चुकलं आणि काय घटना याबद्दल डॉक्टरांनी व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
‘ती’ एक चूक पडली महागात
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया गुप्ता यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं की, सहाव्या महिन्यापर्यंत गर्भात बाळाची पूर्ण विकास होत असतो. पण एक महिला सहाव्या महिन्यात डॉक्टरांकडे तपासणीसाठी आली. तेव्हा डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी महिलेला विचारलं, तिने आतापर्यंत चेकअप केलं होतं की नाही? तेव्हा त्या महिलेने सांगितलं, की कुटुंबाला तिने अनेकदा याबाबत सांगितलं होतं. मात्र कुटुंबाने महिलेला डॉक्टरांकडे तपासणी करण्यासाठी मनाई केली. याचा परिणाम म्हणजे त्या गर्भवतीच्या गर्भातील बाळ हे विना डोक्यचं होतं. हा गंभीर जन्मजात विकार असून त्याला वैद्यकीय भाषेत Anencephaly असं म्हणतात.
डॉक्टरांनी सांगितलं की, या स्थितीत बाळाचा मेंदू आणि डोक्यावरील भाग विकसित होत नाही. असं बाळ जिवंत राहू शकत नाही. गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्यांमध्ये फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे ही गंभीर समस्या उद्भवू शकते. फोलिक अॅसिड गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात बाळाचं डोकं आणि पाठीच्या कण्याचा विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.
स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात की, महिलेच्या कुटुंबातील मंडळी निष्काळजीपणा करीत असतील तर अशा वेळी महिलेनेच पुढाकार घ्यायला हवा. या प्रकरणात जर कुटुंबाने दुर्लक्ष केलं नसतं तर योग्य वेळेत फोलिक अॅसिडच्या गोळ्यांमुळे बाळ वाचलं असतं आणि त्याच्या डोक्याचा विकास झाला असता. त्यामुळे प्रेग्नेन्सीची टेस्ट पॉझिटिव्ह येताच डॉक्टरांच्या सल्ल्याने फोलिक अॅसिड टॅबलेट घ्यायला हवं.
FAQ
प्रश्न १: सोशल मीडियावर डॉ. सोनिया गुप्ता यांनी कोणती धक्कादायक घटना सांगितली?
उत्तर: डॉ. सोनिया गुप्ता यांनी एका गर्भवती महिलेची घटना सांगितली, ज्यात कुटुंबाच्या दुर्लक्षामुळे सहाव्या महिन्यात सोनोग्राफी केल्यावर गर्भातील बाळ विना डोक्याचे (Anencephaly) आढळले. यामुळे बाळ जिवंत राहू शकत नाही.
प्रश्न २: या घटनेत नेमके काय चुकले?
उत्तर: महिलाने कुटुंबाला अनेकदा तपासणीसाठी सांगितले, पण कुटुंबाने मनाई केली. परिणामी, गर्भावस्थेच्या सुरुवातीला नियमित तपासणी आणि फॉलिक अॅसिड न घेतल्याने बाळाचा मेंदू आणि डोक्याचा विकासच झाला नाही.
प्रश्न ३: Anencephaly म्हणजे काय?
उत्तर: Anencephaly हा जन्मजात विकार आहे, ज्यात बाळाचा मेंदू आणि डोक्यावरील भाग विकसित होत नाही. हा गंभीर आजार असून, अशा बाळाला जिवंत राहणे शक्य नाही. याची सुरुवात गर्भावस्थेच्या पहिल्या आठवड्यांमध्ये होते.








