Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण नगरपालिकेतील कार्याचा ठसा, रामराजेंचा विश्वास आणि सामाजिक कार्यातील पत्नीची भक्कम साथ

फलटण नगरपालिकेतील कार्याचा ठसा, रामराजेंचा विश्वास आणि सामाजिक कार्यातील पत्नीची भक्कम साथ

फलटण (प्रतिनिधी) — हरीष काकडे हे प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यात पत्नीची भक्कम साथ असल्यामुळेच त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यात यश मिळवले आहे. दिव्यांगांसाठी शासकीय निधी मिळवून देणे, पेन्शन सुरू करून देणे अशा महत्वाच्या कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

न्यायहक्कासाठी मोर्चे, आंदोलने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग असून नगरसेवक सनी (दादा) अहिवळे यांच्यासह त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

या कार्याची दखल घेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी हरीष काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या संधीचा उपयोग करत काकडे यांनी बौद्ध व मागासवर्गीय समाजाच्या समस्या सोडवण्याचे काम हाती घेतले.

लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगळवार पेठेतील मतदारांना प्रभावीत करून, सनी अहिवळे यांच्या सहकार्याने उमेदवारासाठी लक्षणीय लीड मिळवण्यातही ते यशस्वी ठरले.

आज मंगळवार पेठेतील नागरिक हरीष काकडे यांच्या पत्नीच्या माध्यमातून, काकडे यांना फलटण नगरपालिकेत संधी मिळेल का याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्या कामाची पारदर्शकता व लोकहिताचे दृष्टिकोन पाहता ही संधी त्यांना मिळावी अशी जनतेत भावना आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments