अकलूज नगरपरिषदेतील आरक्षण सोडत जाहीर — महिलांना  ५०% प्रतिनिधित्व!

0
167
अकलूज नगरपरिषदेतील आरक्षण सोडत जाहीर — महिलांना  ५०% प्रतिनिधित्व!

अकलूज :- अकलूज नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर १३ प्रभागांतील २६ जागांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम उपविभागीय अधिकारी विजय पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पडला. लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्याने या प्रक्रियेत पारदर्शकतेची पूर्णतः खात्री देण्यात आली.

🔹 महिलांना ५० टक्के आरक्षण

नगरपरिषद कायद्यानुसार १३ प्रभागांपैकी १३ जागा म्हणजेच ५०% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी विशेष आरक्षण दिले गेले आहे.

🔹 महत्त्वाचे प्रभाग झाले आरक्षित, बदलणार राजकीय समीकरणे

सोडतीनंतर अनेक महत्त्वाचे आणि राजकीयदृष्ट्या प्रभावशाली प्रभाग आरक्षित झाले असून, त्यामुळे सध्याच्या नगरसेवकांना आपल्या प्रभागांची फेरमांडणी करावी लागू शकते. अनेक इच्छुक उमेदवारांची गणिते बदलली असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

🔹 नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षित

यंदा नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे अकलूज नगर परिषदेला पहिली महिला नगराध्यक्षा मिळणार हे निश्चित आहे. पायल मोरे, रेश्मा गायकवाड, अनुराधा साठे व रेश्मा अडगळे या प्रमुख इच्छुक नावांची चर्चा रंगली आहे.

🔹 प्रभागनिहाय आरक्षण यादी — अनुसूचित जाती व मागास प्रवर्ग (महिला)

अनुसूचित जाती – महिला (३ प्रभाग) :

  • प्रभाग क्र. १०
  • प्रभाग क्र. ०२
  • प्रभाग क्र. ०७

नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला (४ प्रभाग) :

  • प्रभाग क्र. ०५
  • प्रभाग क्र. १२
  • प्रभाग क्र. ०८
  • प्रभाग क्र. ०६

उर्वरित जागांवर देखील महिला आणि विविध गटांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.