फलटण तालुक्यातील १३ कि.मी. रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा

0
32
फलटण तालुक्यातील १३ कि.मी. रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा

रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पाठपुरावा – मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून तालुक्याला दिलासा

फलटण : फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील १३ कि.मी. लांबीचे ५ अवगीकृत/योजनाबाह्य रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता मिळाली आहे.

या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची गुणवत्ता व सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उंचावणार असून, शेतकरी व ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळणार आहे.

ग्रामीण मार्गाचा दर्जा मिळालेले रस्ते :

  1. राजाळे गाव – फलटण आसु रस्ता (टेंगील वस्ती ते अनपट वस्ती) : २ कि.मी.
  2. राजाळे गाव अंतर्गत – आसु रोड ते पिंपरद रस्ता : ४ कि.मी.
  3. राजाळे जाधव वस्ती (शिवाजीनगर) ते सोनगाव रस्ता : १ कि.मी.
  4. आळजापुर ते पवार वस्ती – मसुगडे वस्ती ते रणदिवे वस्ती : ३.५० कि.मी.
  5. आळजापुर ते शिंदे वस्ती (धनगरवाडा) बिबी रस्ता : २.५० कि.मी.

स्थानिक नेत्यांचा पुढाकार

या पाठपुराव्यात आमदार सचिन पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसलेविलासराव नलवडे यांनी विशेष भूमिका बजावली.
यापुढे फलटण तालुक्यातील रस्त्यांसाठी आणखी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.