Tuesday, September 15, 2026
Homeसातारा"फलटणचा अभिमान! रणजितसिंह भोसले मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश"

“फलटणचा अभिमान! रणजितसिंह भोसले मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश”

फलटण प्रतिनिधी उमेश काकडे  :फलटण शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. शहरातील सुपुत्र रणजितसिंह भोसले यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती मिळवली आहे.

भोसले कुटुंबीयांचा न्याय क्षेत्रातील वारसा मोठा आहे. रणजितसिंह भोसले यांचे वडीलही न्यायव्यवस्थेत कार्यरत राहून समाजात न्याय व पारदर्शकता प्रस्थापित करण्यासाठी ओळखले जात होते. मुलानेही त्याच परंपरेला साजेसा वारसा चालवत उच्च न्यायालयात पद मिळवून फलटण शहराचा लौकिक उंचावला आहे.

फलटण व परिसरातून या नियुक्तीचे जोरदार स्वागत होत असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व कायदा क्षेत्रातील मान्यवरांनी भोसले यांचे अभिनंदन केले आहे. न्यायालयीन क्षेत्रातील त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments