Ajit Pawar : आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणपासून बाजूला गेलो नाही, आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीच सांगितलं होतं, त्याबाबत आम्ही ठाम असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. एखादा निर्णय कर्जमाफीचा बाबत घ्यायचा असेल तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक सगळ्या बाबी तपासाव्या लागणार आहेत. यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली आहे असे अजित पवार म्हणाले. ते साताऱ्यात बोलत होते.
शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कधीच म्हणलेलो नाही. योग्य वेळ आल्यावर नेमलेली कमिटी त्यासंदर्भातील माहिती देईल यानंतर योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करणार आहोत असे मतअजित पवार यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून गणपती दर्शनाचं निमंत्रण दिलं आहे याबाबत अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिले. एका भावाने एका भावाला फोन करून गणपतीला बोलावलं मी कसं बघतो मी तसं बघतो. एक भाऊ दुसऱ्या भावाच्या घरी गणेशोत्सवाला जाणार आहे काय बघतो कसं बघतो असं बघतो की कसं बघतो असे मिश्किल उत्तर अजित पवार यांनी दिलं आहे. पेटा या संस्थेने केलेल्या कबुतरांच्या समर्थनार्थ केलेल्या जाहिरात बाजीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोण काय म्हणतं यापेक्षा कायद्याने संविधानाने सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे. जर आपलं काही वेगळं मत असेल तर ते न्यायालयासमोर मांडावं. सर्वोच्च न्यायालय त्याबाबतचा निर्णय देईल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबतचा निर्णय दिलेला आहे आणि त्या पद्धतीने अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम आहे.
चांद्यापासून बांध्यापर्यंत आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करुयात
चांद्यापासून बांध्यापर्यंत आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करुयात असे अजित पवार म्हणाले. 27 तारखेला गणरायांच आपल्याला स्वागत करायचं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यावर या जिल्ह्याने प्रेम केले आहे. आदरणीय पवार साहेबांना मनापासून साथ या जिल्ह्यानं दिली आहे. आपण आपल्या लोकांना AI सारखं नवीन तंत्रज्ञान सांगितलं पाहिजे असे अजित पवार म्हणआले. उगीच एकमेकांची उणी धुनी काढत बसण्यापेक्षा अशा क्षेत्रात लक्ष दिलं पाहिजे. साहेब जरी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असले तरी चेअरमन चंद्रकांत दळवी यांना केले आहे. यात 4 लाख मुलं शिक्षण घेत असल्याचे अजित पवार म्हणाले.
निवडणुकीत अपयश आल्यावर आता विरोधक रडीचा डाव खेळत आहेत
दिन का भूक शाम की घर आये तो उसे भूल नही कहते अनिल देसाई पुन्हा घरी आलेत असे अजित पवार म्हणाले. निवडणूक डिसेंबरपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येकाने पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे अजित पवार महणाले. कोणत्याही परिस्थितीत एकट वाटून देऊ नका, पक्ष तुमच्या सोबत आहे. निवडणुकीत अपयश आल्यावर आता विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. माणवासीयांच स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
आणखी वाचा