Tuesday, September 15, 2026
Homeसातारासातारा जिल्हा बँकेचा अभिनव निर्णय; शेतीत तंत्रज्ञानाची क्रांती

सातारा जिल्हा बँकेचा अभिनव निर्णय; शेतीत तंत्रज्ञानाची क्रांती

सातारा : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि बँकेच्या प्रगत दिशेने वाटचाल या दुहेरी उद्दिष्टाने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. ठिबक सिंचनासाठी अनुदान आणि शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा निर्णय या सभेत जाहीर झाला.

बँकेचे मार्गदर्शक संचालक व विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर (महाराज साहेब) म्हणाले, “सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक जगातील सर्वांत मोठी ‘रोबो बँक’ म्हणून ओळखली जाईल.”

या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, अध्यक्ष खा. नितीनकाका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जेष्ठ सदस्य व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांसह संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.

,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments