2 मुख्यमंत्र्यांना रात्री घरात घुसून अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा! त्यांचं वय पाहून बसेल धक्का

0
5
2 मुख्यमंत्र्यांना रात्री घरात घुसून अटक करणाऱ्या अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा! त्यांचं वय पाहून बसेल धक्का


ED Officer Who Arrested 2 Chief Ministers Resigns: मागील अनेक वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेली केंद्रीय संस्था म्हणजे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी! याच संस्थेत काम करताना दोन मुख्यमंत्र्यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवणारे भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी कपिल राज यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. 16 वर्षांच्या सेवेनंतर कपिल राज यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आहे.

15 वर्षांची सर्व्हिस शिल्लक असताना अचानक राजीनामा का?

45 वर्षीय राज हे 2009 च्या बॅचचे अधिकारी आहेत. ‘वैयक्तिक कारणांमुळे’ कपिल राज यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आयआरएस अधिकारी म्हणून सेवा देणाऱ्यांचं निवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. म्हणजेच कपिल राज यांची अजून 15 वर्षांची सेवा शिल्लक होती. असं असतानाही त्यांनी अचाकन राजीनामा देण्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. कपिल राज यांनी ईडीमध्ये जवळजवळ आठ वर्षे सेवा केली आहे. या कालावधीमध्ये त्यांनी दोन वेगवेगळ्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांच्या अटकेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

चार महिन्यात दोन मुख्यमंत्र्यांविरोधात कारवाई

राज हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेले आणि मोठ्या मोठ्या प्रकरणांमध्ये तपासामध्ये अग्रस्थानी राहिलेले अधिकारी म्हणून कायमच लक्षात राहतील अशी त्यांची कारकिर्द आहे. ईडीमध्ये कार्यरत असताना कपिल राज यांनी जानेवारी 2024 मध्ये रांची येथील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेच्या कारवाईवर लक्ष ठेवले होते. काही महिन्यांनंतर, मार्च 2024 मध्ये, दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी ईडीच्या झडतीनंतर कपिल राज हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

अचानक छापेमारीच्या ठिकाणी पोहोचायचे

कपिल राज हे तपास अधिकारी म्हणून अत्यंत चाणाक्ष आणि कुशल होते. कपिल राज हे राजकीय अटकांसाठी चौकशी प्रश्नावली तयार करत आणि अंतिम रूप देत असत, अशी माहिती ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिली. तपासावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांच्या टीमचे मनोबल वाढवण्यासाठी कपिल राज अनेकदा शोधमोहिमांदरम्यान अचानक छापेमारीच्या ठिकाणी अथवा घटनास्थळी पोहोचायचे.

मुंबईत कार्यरत असताना नीरव मोदी, मेहुल चोक्सीची ही केली चौकशी

मुंबईत ईडीचे उपसंचालक म्हणूनही कपिल राज यांनी काम पाहिले. या पदावर काम करताना कपिल राज यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, डीएचएफएल आणि इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणांची चौकशी देखील केली होते.





Source link