गाळेधारकांना मिळाला न्यायाचा विश्वास, मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गाळेधारकांचा भाजपात जाहीर प्रवेश

0
15
गाळेधारकांना मिळाला न्यायाचा विश्वास, मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत गाळेधारकांचा भाजपात जाहीर प्रवेश

फलटण (प्रतिनिधी) : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळेधारकांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी ग्रामविकास मंत्री मा.ना. जयकुमारजी गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गाळेधारकांनी आपल्या अडचणी मांडत स्पष्ट व ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर मंत्री गोरे यांनी गाळेधारकांच्या न्याय्य मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या विश्वासदायक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीतील सर्व व्यापारी गाळेधारकांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून भाजपाच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष बापूराव (विकास) शिंदे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.