‘
फलटण :- फलटण तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्यासाठी एक विशेष संवाद सहविचार सभा दिनांक 12 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे संपन्न होणार आहे.
या सभेला मा. ना. श्री. जयकुमारजी गोरे (मंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य), मा. खासदार श्री. रणजितसिंह निंबाळकर व मा. आमदार श्री. सचिनजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सभेचे आयोजन गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, अडचणी, उपाययोजना यावर खुले संवाद साधून निर्णयात्मक चर्चा करण्यात येणार आहे.
सर्व शिक्षक व अधिकारी वर्गांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.