स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरविण्यासाठी दि. 11 जुलै रोजी बैठक
फलटण – येत्या शुक्रवार, दिनांक 11 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) फलटण तालुकास्तरीय एक महत्वपूर्ण बैठक आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. अशोकराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या बैठकीत आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच साखरवाडी येथील शासकीय जागेवर बुद्ध विहार स्थापनेसाठीची पुढील रणनीती, आणि आयत्या वेळेस उद्भवणाऱ्या विविध विषयांवर चर्चा करून त्यावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहेत.
या बैठकीसाठी अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असून त्यामध्ये:
🔹 श्री. प्रमोद काकडे (मुंबई प्रदेश संघटक)
🔹 श्री. विजय येवले (जिल्हा सचिव, सातारा)
🔹 श्री. संजय निकाळजे (जिल्हा सदस्य, सातारा)
🔹 श्री. मधुकर काकडे (पश्चिम महाराष्ट्र संघटक)
🔹 श्री. राजू मारुडा (जिल्हा उपाध्यक्ष, सातारा)
तसेच इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीसाठी फलटण तालुका व शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष सतीश अहिवळे, शहराध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, तसेच महिला आघाडी प्रमुख विमलताई काकडे व सारिका अहिवळे यांनी केले आहे.