Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण बसस्थानक वाहतूक नियोजनात बदल – प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

फलटण बसस्थानक वाहतूक नियोजनात बदल – प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

फलटण (प्रतिनिधी) – दिनांक 28 जून 2025 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटण शहरात आगमन करत असल्याने, या दिवशी फलटण बसस्थानकावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पुढील नियोजनानुसार वळवण्यात आली आहे. सर्व प्रवाशांनी हे नियोजन लक्षात घेऊन आपली बस संबंधित नव्या पॉईंटवरून पकडावी.

🔹 जिनींग पॉईंट (मुधोजी कॉलेज शेजारी)
येथून सातारा, पुणे, मुंबई, लोणंद, पुसेगाव या मार्गांवरील बसेस मार्गस्थ होतील.

🔹 कोळकी पॉईंट (शिंगणापूर रोड)
दहिवडी, शिंगणापूर, पंढरपूर, गिरवी, धुमाळवाडी या मार्गांवरील बसेस येथे उपलब्ध असतील.

🔹 गोविंद दूध डेअरी पार्किंग पॉईंट
पंढरपूर, आसू, गुणवरे, लातूर, अक्कलकोट या मार्गांवरील बसेस येथे थांबतील.

🔹 सोमवार पेठ पॉईंट (फिरंगाई देवी मंदिराजवळ)
मलकापूर, बुलढाणा, शिर्डी, बारामती या दिशेने जाणाऱ्या बसेस येथून सुटतील.

🔹 जिंती नाका पॉईंट
वडगाव, साखरवाडी, जिंती या मार्गांवरील बससेवा याच ठिकाणावरून सुरू राहील.

प्रवाशांनी वरील बदल लक्षात घेऊन आपली नियोजन पूर्वक यात्रा करावी व गैरसोयीपासून बचाव करावा. हा बदल केवळ 28 जून रोजी लागू राहील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments