Saturday, August 22, 2026
Homeसाताराआपत्कालीन मदतीसाठी फलटणमध्ये NDRF टीम दाखल होणार – मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर...

आपत्कालीन मदतीसाठी फलटणमध्ये NDRF टीम दाखल होणार – मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष प्रयत्न

फलटण (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आज रात्री १२ वाजेपर्यंत 30 जणांची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची विशेष टीम फलटणमध्ये दाखल होणार आहे.

मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही तातडीची कारवाई घडवून आणली आहे.

ही टीम मदतीसाठी लागणाऱ्या बोट्स, जीवन रक्षक उपकरणे व विविध तांत्रिक साधनांनी सज्ज असून, आज (रविवारी) पहाटेपासून ती फलटण तालुक्यात कार्यरत होईल. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर ही टीम उपाययोजना राबवणार आहे.

यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी राहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments