अभयकुमार दुबे यांचा कॉलम: वाढत चाललीय पाकिस्तानचे‎ तुकडे – तुकडे होण्याची शंका‎, सिंध, पख्तून व बलुच फुटीरतावाद‎

0
16
अभयकुमार दुबे यांचा कॉलम:  वाढत चाललीय पाकिस्तानचे‎ तुकडे – तुकडे होण्याची शंका‎, सिंध, पख्तून व बलुच फुटीरतावाद‎


  • Marathi News
  • Opinion
  • Pakistan’s Fragmentation Is Increasing Suspicion Of Disintegration, Sindhi, Pakhtun And Baloch Separatism

4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

१९७१ मध्ये एकदा पाकिस्तानची फाळणी झाली. ५०‎वर्षांनंतर दुसऱ्यांदा फाळणी होण्याची शक्यता नाकारता‎येत नाही. या वेळी पाकिस्तान फुटला तर त्याचे अनेक‎तुकडे होतील. या प्रकरणातील पहिला प्रश्न असा आहे‎की, मागील फाळणीच्या मॉडेलची पुनरावृत्ती करता येईल‎का?‎

मागील मॉडेलमध्ये तीन विशेष गोष्टी होत्या. भारताच्या‎लष्करी हस्तक्षेपाने निर्णायक भूमिका बजावली. ७० च्या‎दशकातील शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनने‎भारताला दिलेल्या पाठिंब्यामुळे अमेरिकेची पाकिस्तान‎समर्थक भूमिका निष्प्रभ झाली. त्या वेळी पाकिस्तान‎आधीच अतिशय अनैसर्गिक पद्धतीने दोन दूरच्या‎भौगोलिक भागांत विभागलेला होता. पाकिस्तानच्या ‎‎फाळणीचे आणखी एक संभाव्य मॉडेल आहे, ते त्याच्या ‎‎अंतर्गत राजकारणातील विकृतींमुळे होणाऱ्या संभाव्य ‎‎स्फोटाशी जोडलेले आहे. या अंतर्गत स्फोटांची भीती ‎‎पहिल्यांदा २०२२ मध्ये प्रकर्षाने समोर आली, तेव्हा ‎‎पाकिस्तानच्या एका वरिष्ठ नेत्याने उघडपणे पाकिस्तान‎फुटला तर तो कसा आणि का फुटेल याचे तपशीलवार ‎‎स्पष्टीकरण दिले. हे विधान इम्रान खान यांनी केले होते, ते ‎‎पंतप्रधान होते आणि पाकिस्तानला विघटनाच्या‎धोक्यापासून वाचवण्यासाठी मुक्त व निःपक्ष निवडणुका‎घेण्याची मागणी करत होते.‎

इम्रान म्हणाले होते : “संस्था योग्य निर्णय घेत नसतील तर‎त्याही नष्ट होतील. आपण चूक केली तर फटका बसणारी‎सर्वात मोठी संस्था कोणती असेल? पाकिस्तानी सैन्य.‎सैन्याला फटका बसल्यावर आपल्याकडून कोणती‎सवलत घेतली जाईल? युक्रेनकडून अण्वस्त्र‎निःशस्त्रीकरणासाठी घेतलेली सवलत. सर्वात मोठा मुद्दा‎असा आहे की, आपला एकमेव मुस्लिम देश आहे,‎ज्याकडे अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता आहे. ती गेली तर काय‎होईल? पाकिस्तानचे तीन भाग होतील.”‎

येथे इम्रान वेगळ्या सिंध राष्ट्र, पख्तून राष्ट्र आणि‎बलुच राष्ट्राकडे बोट दाखवताना दिसतात. फक्त‎पंजाबसह पाकिस्तान राहील. ज्या वेळी हे विधान‎करण्यात आले, त्या वेळी सिंधमध्ये वारंवार कर्फ्यू‎लावला जात होता. खैबर पख्तुनख्वाचे नेते‎इस्लामाबादविरुद्ध त्यांच्या प्रादेशिक सैन्याचा वापर‎करण्याची धमकी देत ​​होते. बलुचिस्तानमध्ये सशस्त्र‎बंडखोर सैन्यावर हल्ला करत होते.‎

आज इम्रान तुरुंगात आहेत. त्यांचा पक्ष राजकीयदृष्ट्या‎जवळजवळ निष्क्रिय झाला आहे. शाहबाज शरीफ‎लष्कराच्या प्याद्यासारखे राज्य करत आहेत. अमेरिकेला हे‎माहीत आहे, म्हणूनच परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो‎भारताकडून युद्धबंदी मिळवण्यासाठी शरीफ यांच्याआधी‎जनरल असीम मुनीर यांच्याशी बोलले. अमेरिकेने‎आयएमएफकडून २.२५ अब्जची डाॅलरची व्यवस्था केली‎नसती तर इम्राननी ज्या डिफॉल्ट परिस्थितीचा उल्लेख‎केला होता तीच परिस्थिती उद्भवली असती.‎

पाकिस्तानचे विभाजन होण्यापासून तीन शक्ती रोखत‎आहेत : त्याचे सैन्य, अमेरिका आणि चीन. लष्कराने खरी‎राजकीय प्रक्रिया स्थगित केली आहे आणि पूर्णपणे‎बनावट राजकीय प्रक्रिया लादली आहे. इम्रान नक्कीच‎तुरुंगात आहे, पण ते पाकिस्तानचा सर्वात लोकप्रिय नेते‎आहेत. आज निवडणुका प्रामाणिकपणे झाल्या तर त्यांना‎एकतर्फी विजय मिळेल. अमेरिका कसा तरी‎पाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था टिकवून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ठेवत आहे. पाकिस्तानवर प्रचंड परकीय कर्ज आहे,‎त्यापैकी एकपंचमांश कर्ज चीनचे आहे. जगातील सर्वात‎मोठी शक्ती अमेरिका व त्याच्या बरोबरीचा होऊ पाहणारा‎चीन, दोघांनाही पाकिस्तानचे चार तुकडे करून तो नष्ट‎होऊ नये, असे वाटते. दक्षिण आशियातील भारताचा उदय‎रोखण्यासाठी पाकिस्तानने भारताचा पाय खेचण्यासाठी‎राहावे, अशी त्यांची इच्छा आहे.‎

पाकिस्तानला कायमचे टिकायचे असेल तर तिथे राजकीय‎प्रक्रिया पूर्ववत करावी लागेल. निवडून आलेल्या‎लोकप्रिय सरकारला बलुच, सिंध आणि पख्तून‎उपराष्ट्रीयत्वाच्या प्रतिनिधींना वाटाघाटीच्या टेबलावर‎आणावे लागेल. त्यांना सांस्कृतिक व राजकीय स्वायत्तता‎दिली पाहिजे. १९४७ च्या फाळणीनंतर भारताने नागालँड,‎मिझोराम, पंजाब, काश्मीर व सुरुवातीला तामिळनाडूत‎विविध रणनीती वापरून फुटीरतावादी राजकारण निष्प्रभ‎केले आणि राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण केले. पाकिस्तानी‎लोकांची इच्छा असेल तर ते या बाबतीत भारताकडून‎शिकू शकतात.‎

पाकिस्तानला कायमचे टिकून राहायचे‎असेल तर त्याला देशात राजकीयप्रक्रिया‎पूर्ववत करावी लागेल. निवडून आलेल्या‎लोकप्रिय सरकारलाबलुच, सिंध व‎पख्तून उपराष्ट्रीयत्वाच्या प्रतिनिधींना‎वाटाघाटीच्या टेबलावरआणावे लागेल.‎



Source link