साताऱ्यात मोबाईल टॉवर कोसळलं, नाशकात झाड उन्मळून पडलं; पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधारा

0
5


सातारा: राज्यभरातील विविध जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस (Rain) कोसळत असून कुठे झाडं पडली आहेत, कुठे वादळी वाऱ्याने पत्रे उडाले आहेत. तर, कुठे वीज पडून जनावरे दगावल्याचीही घटना घडलीय. साताऱ्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अचानक आलेल्या वळवीच्या पावसाने नागरिकांची धांदल उडवली. सोसाट्याचा वारा, ढगांच्या गडगडाट आणि विजेचा कडकडाटासह मोठा पाऊस साताऱ्यात (Satara) झाला आहे. या आलेल्या वादळी वाऱ्याने कास यवतेश्वर रस्त्यावरील मोबाईल टॉवर कोसळल्याची घटना घडली. या टॉवरखाली 4 ते 5 गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मोबाईल टॉवर कोसळल्याने यवतेश्वर कास रस्ता दोन ते तीन किलोमीटरपर्यंत ठप्प झाला असून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून (police) वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. 

मुंबईतील पश्चिम उपनगरात सायंकाळी 7 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाला आहे. शहरातील अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव,मालाड, कांदिवली बोरिवली, विलेपार्ले,सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दिवसभर उकाड्याने हैराण झालेले मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरामध्ये सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह पुणे, सोलापूर, सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने धुव्वाधार आगमन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधावर पाऊस सुरू आहे.  

पुणे, रत्नागिरीत पावसाने जनजीवन विस्कळीत

पुण्यातील स्मार्ट सीटी प्रकल्पाचा भाग असलेल्या बाणेर भागात काही वेळ झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी साचले. बाणेरमधील बीटवाईज चौकात अनेक वाहन पावसाच्या या पाण्यात अडकली होती. रत्नागिरी परिसरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस आणि तेजस एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या तुलनेत 2 तास उशिराने धावत आहेत.

नाशिकमध्ये झाड उन्मळून पडले

नाशिकमधील झाड पडण्याची मालिका सुरूच असून सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने कॉलेज रोडसह इतर भागत ही वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये, वाहनाचे नुकसान झाले, सुदैवाने जीवित हानी नाही. शहरातील अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाला असून गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. वीज वितरण कंपनी आणि महापालिकाच्या मान्सून पूर्व कामाची या पावसामुळे पोलखोल होतेय. 

सोलापुरात पाऊस, बार्शीत शेड कोसळले

सोलापूर जिल्ह्यातही पावसान दमदार हजेरी लावली असून बार्शीत पावसामुळे कॅन्टीनचे छत कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एक जण जखमी तर पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. बार्शी तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनचा पत्र्याचा छत कोसळल्याने घडली घटना. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, एका जखमी व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने बचावकार्य करून पाच व्यक्तींना सुखरूप काढले बाहेर

हेही वाचा

अधिक पाहा..



Source link