Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण रेवेन्यू क्लबसाठी ९.९५ कोटींचा निधी मंजूर

फलटण रेवेन्यू क्लबसाठी ९.९५ कोटींचा निधी मंजूर

जुन्या इमारतीच्या जागी होणार नवी भव्य इमारत

फलटण | महाराष्ट्र शासनाने फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेवेन्यू क्लबसाठी ९ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच क्लबच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.

रेवेन्यू क्लबची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय असून, एकेकाळी वैभवशाली असलेली ही इमारत आता पूर्णतः मोडकळीस आली आहे. काही दिवसांपूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी क्लबची पाहणी करून सदर इमारतीची दुरवस्था पाहता ती धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर तातडीने प्रस्ताव सादर करून नवीन इमारतीसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यात आला.

रेव्हेन्यू सबोर्डिनेट वेलफेअर फंड कमिटी, फलटणचे अध्यक्ष आणि निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी महसूल परिवाराच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, “महसूल परिवाराच्या सुविधा व कल्याणासाठी ही नवीन इमारत अत्यंत महत्त्वाची असून, यासाठी रणजितदादा आणि आमदार पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच आम्हाला मंजुरी मिळाली आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments