
मास्टरमाइंड कुठे आहेत?
‘कसाबला जिवंत पकडणं आणि त्याची ओळख पटणं किती महत्त्वाचं होतं हे आता मला समजतंय. मात्र, अजूनही धोका टळलेला नाही. कारण, कसाब हा एक बाहुलं होता. त्याच्या सूत्रधारांना शोधण्यासाठी आपण काय करतोय. जोपर्यंत त्याचा समूळ नायनाट होत नाही, तोपर्यंत दहशतवादी हल्ला होणार नाहीत याची गॅरंटी नाही, अशी भीती देखील देविका व्यक्त करते.




